Logo
ताज्या बातम्या

पुढील काही तासांत राज्यात पावसाची शक्यता; 13 जिल्ह्यात सरी बरसणार, छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा

पुढील काही तासांत राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राज्य हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना छत्री किंवा रेनकोट घेऊन निघावे असा सल्ला देण्यात येत आहे.हवामान विभागाने याप्रकरणी फेसबुक पोस्ट केली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार सरी बरसतील. पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.वायू प्रदूषण वाढल्याचे कारण हवामान विभागाने वाढत्या वायू प्रदूषणाच्या कारणाबाबतही माहिती दिली.वाढलेल्या वायू प्रदूषणामागे प्रामुख्याने संथावलेले वारे कारणीभूत आहेत. उत्तर, मध्य भारतातील आगीच्या घटनांमधून निघणारा धूर, पुणे,मुंबई सारख्या शहरांतील धूळ संथ वाऱ्यांमुळे तात्काळ दूर वाहून जात नसल्याने हवेची गुणवत्ता बिघडली आहे.