Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा वाहतूक नियंत्रण बैठकीत निर्णय

इचलकरंजी वाहतूक आराखड्याचे अंमलबजावणी करण्याचा बैठकीत निर्णय. इचलकरंजी शहरातील वाहनांची वाढती संख्या, बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासह संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी सह रस्त्यावर अतिक्रम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. मुख्य मार्गावर पार्किंगचे पांढरी पट्टे मारणे, दिवाळी बाजार स्थलांतर करणे, पार्किंग झोन ट्रान्सपोर्ट पार्किंग हब,गर्दीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे आदीबाबत निर्णय वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. लवकरच वाहतूक शिस्तीच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम करेल असा विश्वास पोलीस उपाधीक्षक समरसिंह साळवी यांनी व्यक्त केला.तब्बल 3 वर्षानंतर शहरातील वाहतुकीच्या प्रश्न संदर्भात वाहतूक सल्लागार समितीची बैठक पोलीस उपाधिक्षक समरसिंह साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. शहरातील वाहतुकीचे वाढते प्रश्न लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मालवाहतूक संघटना, फेरीवाला समिती, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सामाजिक संघटना आणि माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी फिरते पथक नेमावे, रस्ते रुंद करावे, वेग मर्यादेसह स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत, धोकादायक झाडे तोडावीत, रस्त्यावरील आणि विद्युत वाहनांची उंची वाढवण्याच्या सूचना केल्या, यावेळी महापालिका महावितरण एसटी आधार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहतूक उपाययोजनाबाबत धारेवर धरण्यात आले.एसटी व्यवस्थापक सागर पाटील, महावितरण चे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी बांधकाम अभियंता एस एस पाटील, महापालिकेचे अभियंता क्षीरसागर यांनी वाहतूक नियोजनासाठी उपाययोजनाची माहिती दिली. बैठकीत मांडलेल्या सुचनांचे पालन करून वाहतूक नियोजन आणि नियमानबद्दल उपाययोजना केल्या जातील असे पोलीस उपाधीक्षक समरसिंह साळवी यांनी सांगितले. वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजू पाटील यांनी ओव्हरलोड आणि अवजड वाहतुकीच्या प्रश्नावर स्वातंत्र बैठक घेणाऱ असल्याचे सांगितले. या बैठकीला पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, पोलीस निरीक्षक प्रदीप खानापुरे आदिसह नागरिक उपस्थित होते.