कोपरगाव - दि .12/7/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती (खिर्डी गणेश) शाळेत मा. बिपिन दादा कोल्हे पा. सो. अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह यांच्या वाढदिवसानिमित्त प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप चंद्रभान रोहन चेअरमन विविध विकास सहकारी सोसायटी खिर्डी गणेश ,प्रदीप नवले संचालक संजीवनी सहकारी साखर कारखाना,ज्येष्ठ मार्गदर्शक तथा ज्योती पत पतसंस्थेचे संचालक वाल्मीक भास्कर,सुरेश रोहोम ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थितीतीत करण्यात आले.
यावेळी मान. बिपिन कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी प्रास्ताविक केले.सुकलाल महाजन यांनी सुत्र संचालन केले तर महादेव प्रधान यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या शिक्षिका ज्योती टोरपे व शिक्षक महेंद्र विधाते यांसह पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
एक चांगले शैक्षणिक काम दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होते आहे. याबाबत सर्वांचे हार्दिक आभार मानून मा.दादांना शाळा व्यवस्थापन समिती व सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.