Logo
ताज्या बातम्या

भारतीय सैन्यात नोकरी करण्याची मोठी संधी; अग्निवीर भरतीसाठी लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्यदलात जाण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे. लष्कराच्या वतीने अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन कॉमन प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २२ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. सैन्यदलामध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहून अनेक तरुण मैदानी चाचणी व लेखी चाचणीचा सराव वर्षानुवर्षे करत असतात. सैन्य भरतीविषयी शिकवणीवर्गामध्ये जाऊनही सराव केला जातो. सैन्यात भरती व्हावे, हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी लष्कराच्या माध्यमातून सैन्य भरती प्रक्रिया राबविली जाते. याविषयीची सविस्तर माहिती लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येते. याशिवाय जिल्हा रोजगार केंद्राकडेही याविषयी माहिती असते. १७ ते २१ वय असणाऱ्या तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे. निवडीचे दोन टप्पे प्रत्यक्ष भरती- सुरुवातीला भरती परीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणी देतील, त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल, त्यानंतर मेडिकल होईल. या सर्व टप्प्यांतील कामगिरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवाराची निवड होईल. अर्ज कसा कराल? • उमेदवारांनी सुरुवातीला अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर CO/OR/Agniveer Apply या लिंकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगीन करावे. त्यानंतर लॉगीन पेजवर जाऊन अर्ज भरावा. • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अटी जाणून घ्याव्यात. अर्ज भरल्यानंतर शेवटी शुल्क भरा आणि प्रिट डाउनलोड करून घ्या. कोणकोणती पदे? अग्निवीर जनरल ड्युटी : यासाठी दहावी पास तरुणांनाही अर्ज करता येणार आहे. टेक्निकल : अग्निवीर टेक्निकल पदासाठी बारावी विज्ञान, आयटीआय व पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी आहे. अग्निवीर ट्रेड्समन : या पदासाठी आठवी पास तरुणांनाही संधी मिळते. ही शैक्षणिक पात्रता असणारे तरुण यासाठी अर्ज करू शकतात. लिपिक : अग्निवीर लिपिक पदासाठी आठवी, दहावी व आयटीआय पास तरुणांना संधी आहे. संपूर्ण माहिती या वेबसाइटवर सैन्यदलाच्या http:// www.joinindianar my. nic. in या अधिकृत वेबसाइटवर सैन्य भरतीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवायी भरतीची माहिती, त्यासाठीची मुदत, शैक्षणिक पात्रता, सीईई व इतर सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.