Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक

पेट्रोलिंग दरम्यान संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याकडून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गावभाग पोलिसांना यश आले आहे. विवेश विशाल साळुंखे असे चोरट्याचे नांव असून त्याच्याकडून 45 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोडसे, सचिन मगदूम, अमर कदम, अमित कदम, आदित्य दुंडगे यांच्या पथकाने केली.