Logo
ताज्या बातम्या

'यूपीएससी'ची प्रिलिम्स पुढे ढकलली; जाणून घ्या नवीन तारीख

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी (दि.२०) लोकसभा निवडणुकीमुळे २६ मे रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा १६ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर अधिकारी निवडण्यासाठी UPSC दरवर्षी तीन टप्प्यात नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. युपीएससीने सांगितले की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक पाहता, आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’ परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाइन जारी केले जातील. निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्व परीक्षा १६ जूनला होणार असून मुख्य परीक्षा २० सप्टेंबरपासून पाच दिवस चालणार आहे.