Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : पाण्याचे नियोजन कोलमडले

पंचगंगा नदीचे दूषित पाणी, नदीचे पात्र कोरडे आणि कृष्णा जलवाहिनीला वारंवार लागणारी गळती अशा विविध कारणांमुळे इचलकरंजी शहराला स्वच्छ व नियमित मुबलक पाणी पुरवठा करण्यात महापालिका प्रशासनाला मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णतः कोलमडून शहरवासीयांना चार - पाच दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी भिषण परिस्थिती उद्भवली असल्याने पुढील दोन महिने पाण्याचे योग्य नियोजन करणे महापालिकेसमोर मोठे आव्हान असणार आहे.