आज शुक्रवारी दिनांक 8 रोजी दुपारी बारा वाजता राज्यातील महिला भगिनींनी खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळावा तसेच आमदार प्रकाश आवडे यांच्या विशेष प्रयत्नातून इंचलकरंजी मिळालेली नवीन ओळख उप प्रादेशिक परिवहन एमएच ५१ इंचलकरंजी कार्यालयाचे उद्घाटन तसेच इंचलकरंजी जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार मनीषाताई कायदे, माजी खासदार निवेदिता माने, मोसमी आवाडे ,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुरेश हाळवणकर,रजणी ताई मगदूम, अरुण इंगवले, राजवर्धन नाईक निंबाळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.