भारतात ६४ टक्के महिला कर्मचारी वर्क फ्रॉम ऑफिस प्रकारे काम करतात, तर २१.८ टक्के महिला हायब्रिड आणि १३.५ टक्के महिला कर्मचारी रिमोट किंवा वर्क फ्रॉम होम प्रकारे काम करतात. लिंक्डइनने महिला दिनानिमित्त ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पण मिलेनियल महिलांचा वाढता कल हा रिमोट वर्कसाठी असल्याचे या अहवालातून दिसते.
ज्यांचा जन्म १९८१ ते १९९६ या काळात झाला आहे, त्यांना मिलेनियल जनरेशन म्हटले जाते, यालाच जनरेशन वाय (Y) असेही नाव आहे. तर १९९७ ते २०१२मध्ये जन्मलेल्या पिढीला जनरेशन Z असे मह्टले जाते.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटवर असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील ४४ टक्के कंपन्यानी कामासाठी आता हायब्रीड कार्यपद्धती स्वीकारली आहे. तर १० टक्के कंपन्या रिमोट पद्धतीने काम करतात. असे जरी असले तरी रिमोट प्रकारे काम करण्याला मिलेनियल महिलांची (१४.४ टक्के) वाढती पसंती आहे, असे या अहवालात म्हटले आहे.