मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला. एमसीक्सवर एप्रिल २०२४ डिलिव्हरी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६५,४०० रुपयांजवळ पोहोचला. विशेष म्हणजे सोने मार्चच्या पहिल्या आठवड्यात २,७०० रुपयांहून अधिक महागले आहे. (Gold Rate Today)
अमेरिकची फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदरात कपात करणार असल्याच्या आशेने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोन्याचा दर उच्चांकी प्रति औंस २,१५२ डॉलरवर होता. दरम्यान, चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
दरम्यान, MCX सोने कॉन्ट्रॅक्टची किंमत बुधवारपर्यंत वार्षिक आधारावर ३.१२ टक्क्यांनी म्हणजेच १,९७५ रुपयांनी वाढली आहे.
दरम्यान, आज एमसीएक्स चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. चांदीचा प्रतिकिलो दर ७४,०१५ रुपयांवर आहे.
उत्पादन शुल्क, मेकिंग चार्जेस आणि राज्यातील कर यासारख्या काही मापदंडांच्या आधारावर देशातील वेगवेगळ्या भागांत सोन्याची किंमत बदलते.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६४,४९३ रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७१,७१० रुपयांवर होता. तर आज २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,०४९ रुपयांवर खुला झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,५८४ रुपयांवर गेला. चांदीचा दर आज प्रति किलो ७२,१२१ रुपयांवर खुला झाला आहे.
शुद्ध सोने कसे ओळखाल?
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.