मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या गावी शेतात जाऊन काम करण्यास वेळ आहे; पण इचलकरंजीच्या जिव्हाळ्याच्या सुळकूड योजनेच्या पाणी प्रश्नावर बैठक घेण्यास वेळ नाही. त्याच्या निषेधार्थ आगामी इचलकरंजी दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय इचलकरंजी सुळकूड योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात समितीची व्यापक बैठक घेण्यात आली.