Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेला गंडा

खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्याने दोन लाख २५ हजार रुपयांचे दागिने हातोहात लंपास केले. याप्रकरणी छाया धर्मेंद्र कांबळे (वय ३८, रा. शिंदे मळा) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, छाया यांच्या घरी मंगळवारी (दि. २७) अज्ञात व्यक्ती आली. त्याने चांदीचे पैंजण, जोडवी व अंगठ्या पॉलिश करून कांबळे यांचा विश्वास संपादन केला. थोड्या वेळानंतर पुन्हा त्या व्यक्तीने छाया यांना तुमचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत पाणी गरम करण्यास सांगितले.