इचलकरंजीतील औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक वर्षांपासून टँकरने पाण्याची मागणी केली जाते. वर्षभर अनेक कारखानदार व औद्योगिक वसाहतीतील इतर व्यावसायिकांकडून टँकरने पाणीसाठा केला जातो. औद्योगिक वसाहतींमध्ये अनेकांच्या कूपनलिका आहेत; परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे परिसरातील औद्योगिक वसाहतीत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली आहे. मुख्य उन्हाळ्याच्या महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करणे विहीरमालकांना अडचणीचे जाणार आहे.