Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : २५ सिटी बसेस धावणार; मंत्रिमंडळाची मान्यता

इचलकरंजी शहरामध्ये केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई-बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनेक वर्षांनंतर २५ सिटी बसेस शहरातून धावणार आहेत. कामगार वस्ती असलेल्या शहरातील नागरिकांना आता सिटी बसमधून प्रवास करता येणार आहे. देशातील परिवहन सेवेमध्ये सुधारणा करून हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १६ ऑगस्ट २०२३ ला पी. एम. ई-बस सेवा योजना मंजूर केली होती.