Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :वस्त्रनगरीत चोरीच्या वाढत्या घटनांचे सज

इचलकरंजी शहर परिसरात वस्त्रोद्योगाबरोबरच इतर उद्योग व्यवसायाची व कामगार वर्गाची संख्या लक्षणीय आहे. वस्त्रोद्योग म्हणून परिचित असणारे हे शहर 24 तास जागे असते. तरीदेखील गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. चोरट्यांकडून अनेक ठिकाणी बांधकामाच्या साहित्यावर डल्ला मारण्यामध्ये खूपच वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरामध्ये गस्त वाढवावी तसेच बंद पडलेले सीसीटीव्ही तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.