Logo
ताज्या बातम्या

मार्चची हॉलिडे लिस्ट आली! बँक कर्मचाऱ्यांची चांदी, निम्मा महिना बँका बंद, पैशांचे करा नियोजन

फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यात पाच रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवारशिवाय इतर सात दिवशी सुट्ट्या असल्याने बँका बंद राहणार आहेत. २५ मार्चरोजी येणारी होळी व २९ मार्चरोजी असलेल्या गुड फ्रायडेमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल त्यासाठी आजच नियोजन करून ठेवावे लागणार आहे. तसे न केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दिवशी बँका बंद १ मार्च - चापचूर कूट - मिझोराम; ३ मार्च रविवार - सर्वत्र 8 मार्च महाशिवरात्री - सर्वत्र ९ मार्च दुसरा शनिवार - सर्वत्र १० मार्च रविवार - सर्वत्र १७ मार्च रविवार - सर्वत्र २२ मार्च बिहार दिन - बिहार २३ मार्च चौथा शनिवार - सर्वत्र २४ मार्च रविवार - सर्वत्र २५ मार्च होळी, डोलयात्रा - सर्वत्र २६ मार्च याओसांग- मणीपूर, ओडिशा २७ मार्च - होळी - बिहार २९ मार्च - गुड फ्रायडे - सर्वत्र ३१ मार्च रविवार - सर्वत्र