Logo
ताज्या बातम्या

देशातील ४० टक्के लोकांवर संकट, दिल्लीसह अनेक शहरात हवा झाली दूषित

देशातील अनेक शहरात वायु प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. सोमवारी पंजाबपासून ते बंगालपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येला याचा फटका बसत आहे. उत्तर भारतात अमृतसरपासून ते पूर्व बंगालमधील आसनसोल पर्यंत हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहचली आहे. सॅटलाईट इमेजमध्ये गंगेच्या संपूर्ण मैदाणी प्रदेशाला लागून शहरांमध्ये हानिकारक धुके पाहायला मिळाले. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ४२१ पर्यंत पोहचला होता. तर राजस्थानच्या भिवाडी येथे हा आकडा ४३३ पर्यंत गेला होता.पंजाबच्या अमृतसर येथे ३१२, फरीदाबाद येथे ४१२, गाझियाबाद मध्ये ३९१, लखनऊमध्ये २५१, पटणा २६५, आसनसोल मध्ये २१५ आणि धनबादमध्ये २५५ एक्यूआय मोजण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे ५० पर्यंत एक्यूआय हा आरोग्यासाठी योग्य मानला जातो, मात्र तो १५१ ते २०० पर्यंत एक्यूआय हा मध्यम खराब तर ३०१ ते ४०० अत्यंत खराब आणि ४०१ हून अधिक एक्यूआय अत्यंत गंभीर मानला जातो. त्रिपुरा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही हवा बिघडली हिवाळा येताच हवेची गुणवत्ता बिघडू लागते, इन्येतील आसाममधील बिरनिहाट आणि त्रिपुरातील आगरतळापर्यंत या हानिकारक धुक्यामुळे लोकांना त्रास होत आहे. सोमवारी, बिरनिहाटमध्ये AQI २९३ आणि आगरतळामध्ये २२४ होता. मध्य, पश्चिम आणि पूर्व भारतातील नागरिक देखील खराब हवेमुळे त्रस्त आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर (२८६), महाराष्ट्रातील नवी मुंबई (२६१) आणि उल्हासनगर (२६९), गुजरातमधील अंकलेश्वर (२१६) आणि ओडिशातील अंगुल (२४२) यांचा समावेश आहे.राज्य- शहर- AQI पंजाब- भटिंडा- २८८ जालंधर- २२२ लुधियाना- २८२ खन्ना- २२५ राज्य- शहर- AQI हरियाणा- फतेहाबाद- ४२२ गुरुग्राम - ३८४ जिंद- ३८१ हिस्सार- ३७७ उत्तर प्रदेश- ग्रेटर नोएडा- ४२० नोएडा- ३८४ मेरठ- ३५४ राजस्थान- भरतपूर- ३१९ श्रीगंगानगर- ३१० ढोलपूर- ३५७ बिहार- पाटणा- २६५ आरा- २७६ राजगीर- ३१२ सहरसा- ३०६ मध्य प्रदेश- इंदूर- २१४ कटनी- २१६दिल्लीत १३ नोव्हेंबरपासून सम-विषम प्रणाली सोमवारी दिल्लीतील AQI मध्ये अंशत: सुधारणा झाली, परंतु हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत राहिली. AQI रविवारी ४५४ होता, जो सोमवारी ४२१ होता. दिल्ली सरकारने १३ ते २० नोव्हेंबर दरम्यान सम-विषम नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी दिल्लीतील बहुतेक भागांचा AQI अत्यंत खराब किंवा गंभीर श्रेणीत राहिला. सध्या राजधानीच्या हवेत सामान्यपेक्षा चारपट जास्त प्रदूषक आहेत.