इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळा क्रमांक २४, रफीक अहमद किडवाई विद्यामंदिर शाळा क्रमांक ४५ ( उर्दू शाळा) व महात्मा गांधी विद्यामंदिर शाळा क्रमांक १८ या महानगरपालिकेच्या तीन शाळांना भेट दिली. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अजयकुमार बिरनगे, शिक्षण पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांच्यासह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.