Logo
ताज्या बातम्या

'एआय'शिवाय पर्याय नाही! देशातील टेक कर्मचाऱ्यांना येत्या पाच वर्षात करावं लागणार अपस्किल अन् रीस्किल

सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला सुरू आहे. एआयमुळे एकीकडे नोकऱ्या जाण्याची भीती आहेच, मात्र दुसरीकडे यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण देखील होत आहेत. सर्व्हिस नाऊ आणि पिअरसन या कंपन्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, एआय आणि ऑटोमेशनमुळे देशात 4.7 मिलियन नवे टेक जॉब्स तयार होणार आहेत. तसंच, एआयमुळे देशातील 16.2 दशलक्ष कर्मचाऱ्यांना अपस्किल आणि रीस्किल करावं लागणार असल्याचंही या सर्वेक्षणात सांगितलं आहे. गेल्या वर्षात भारतातील टेक जॉब पोस्टिंगमध्ये 39 टक्क्यांची वाढ दिसून आली. ही जगातील सर्वात वेगवान वाढ होती. टेक कर्मचाऱ्यांची मागणी बंगळुरूमध्ये सर्वाधिक होती, असंही या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. भारतात 2027 सालापर्यंत लाखो टेक कर्मचाऱ्यांची मागणी असणार आहे, असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.vयामध्ये अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर (75,000), डेटा अ‍ॅनालिस्ट (70,000), प्लॅटफॉर्म ओनर्स (65,000), प्रॉडक्ट ओनर्स (65,000) आणि इम्प्लिमेंटेशन इंजिनिअर्स (55,000) यांचा समावेश आहे.सर्विसनाऊच्‍या भारतीय उपखंडामधील उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक कमोलिका गुप्‍ता पेरेस म्‍हणाल्‍या, ''भारतातील धोरणकर्ते व उद्योग दिग्‍गजांना एआयची क्षमता माहित आहे. आम्‍ही एआयच्‍या सर्वोत्तम वापराला दाखवण्‍यासाठी देशभरातील प्रत्‍येक उद्योगासोबत काम करत आहोत, ज्‍यामुळे अर्थपूर्ण व्‍यवसाय परिवर्तनाला चालना मिळेल आणि हे परिवर्तन कर्मचाऱ्यांसाठी अर्थपूर्ण, दर्जेदार व विश्‍वसनीय करिअर्स घेऊन येण्‍यासोबत उत्‍पादकतेमध्‍ये वाढ करण्‍याची खात्री मिळेल.'' सर्विसनाऊचे संशोधन भारतातील कर्मचारीवर्गाची विद्यमान स्थिती, उद्योगांमध्‍ये एआय व ऑटोमेशनचा प्रभाव आणि भागधारक मागणी-पुरवठ्यामधील पोकळी भरून काढण्‍यासाठी कर्मचारीवर्गाला कशाप्रकारे संबंधित डिजिटल कौशल्‍यांसह सुसज्‍ज करू शकतात, याबाबतचा रोडमॅप यांचे विश्‍लेषण करते. गुप्‍ता पेरेस पुढे म्‍हणाल्‍या, ''प्रगती वेगाने कधीच झाली नाही, व्‍यवसाय विविध उद्योग क्षेत्रांमध्‍ये मोठ्या प्रमाणात परिवर्तनाला चालना देत आहेत, जे भारताच्‍या १ ट्रिलियन डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यामध्‍ये निर्णायक भूमिका बजावतील.'' मागणीमध्‍ये असलेल्‍या पदांसाठी टॅलेंटचा शोध एआय व ऑटोमेशनचा प्रभाव अनेक वारंवार व टेक्निकल रोजगारांना नवीन आकार देईल, नॉन-टेक्निकल पदांमधील सध्‍याच्‍या अनेक कर्मचाऱ्यांमध्‍ये क्षमता आहेत, ज्‍यांचा उपयोग उच्‍च-दर्जाच्‍या, अधिक टेक्निकल वर्क प्रोफाइल्‍ससाठी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ संशोधनामधून निदर्शनास आले की, भारतातील सखोल समुद्रामध्‍ये मस्‍त्‍यपालन करणाऱ्या कामगारांमध्‍ये सर्विसनाऊ व्‍यासपीठाचा उपयोग करून हेल्‍पडेस्‍क एजंट्ससाठी आवश्‍यक असलेली ६४ टक्‍के कौशल्‍ये आहेत. केरळ व पश्चिम बंगाल सारख्या मत्स्यपालनाचे उच्च प्रमाण असलेले क्षेत्र अशा संधींचा उपयोग करू शकतात आणि नागरिकांच्‍या करिअरसंदर्भातील महत्त्‍वाकांक्षा पूर्ण करू शकतात.सर्विसनाऊचे संशोधन अंदाज वर्तवते की, उत्‍पादन क्षेत्रात मोठा धुमाकूळ निर्माण होईल, जेथे २३ कर्मचारीवर्ग ऑटोमेशन व कौशल्‍य वाढीसाठी सुसज्‍ज असतील, ज्‍यानंतर कृषी, वनीकरण व मासेमारी (२२ टक्‍के), होलसेल व रिटेल ट्रेड (११.६ टक्‍के), परिवहन व स्टोरेज (८ टक्‍के) आणि बांधकाम (७.८ टक्‍के) यांचा क्रमांक आहे. एआयचे अनेक परिणाम एआय व ऑटोमेशनच्‍या परिणामामुळे आजपासून २०२७ पर्यंत ४.६ दशलक्ष कर्मचाऱ्यांनी त्‍यांची क्षमता वाढवणे अपेक्षित आहे. सर्विसनाऊ संशोधनामधून निदर्शनास येते की, कम्‍प्‍युटर प्रोग्रामर्स सारख्‍यापारंपारिक तंत्रज्ञान पदांवर देखील जनरेटिव्‍ह एआय क्षमतांच्‍या वाढीचा परिणाम होईल, जसे टेस्‍ट टू कोड रिस्किल करू शकते आणि सर्विसनाऊ इकोसिस्‍टममध्‍ये फ्लो ऑटोमेशन इंजीनिअर्स, प्रॉडक्‍ट ओनर्स, इम्‍प्‍लीमेन्‍टेशन इंजीनिअर्स, मास्‍टर आर्किटेक्‍ट्स बनण्‍यासाठी विकसित करू शकते. कम्‍प्‍युटर प्रोग्रामर्सचे सर्वाधिक प्रमाण असलेले भारतातील टेक हब्‍स कर्नाटक (३३१,२००), तामिळनाडू (३२३,७००), तेलंगणा (१७१,३००) मोठ्या प्रमाणात स्‍पर्धात्‍मक फायदा मिळवू शकतात. या परिवर्तनामधून एआय व ऑटोमेशनचा विशेषत: उत्‍पादकता वाढवण्‍यामध्‍ये आणि उच्‍च-मूल्‍याचे रोजगार निर्माण करण्‍यामध्‍ये भारताच्‍या विकासावर करू शकणारे सकारात्‍मक परिणाम दिसून येतात.गुप्‍ता पेरेस म्‍हणाल्‍या, ''मॅक्रो स्थिती निदर्शनास आणते की, व्‍यवसाय डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये मूल्‍य वितरित करण्‍यावर लक्ष केंद्रित करतात आणि हे ध्‍येय तुम्‍हाला जलदपणे विकास करण्‍यास मदत करण्‍यासाठी, तसेच होणाऱ्या खर्चासंदर्भात मार्गदर्शन करण्‍यासाठी योग्‍य तंत्रज्ञानासह संपादित करता येऊ शकते. प्रबळ डिजिटल पाया असल्‍याने कर्मचाऱ्यांना आज भविष्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये निर्माण करण्‍यास देखील मदत होईल.'' भारतातील डिजिटल परिवर्तन भविष्‍यासाठी सुसज्‍ज कर्मचारीवर्ग समुदायावर अवलंबून आहे. 'स्किल इंडिया डिजिटल' मोहिमेचा भाग म्‍हणून सरकारने तरूणांकरिता उत्तम भविष्‍य निर्माण करण्‍यासाठी त्‍यांच्‍या दृष्टिकोनाची घोषणा केली आहे. नुकतेच करण्‍यात आलेल्‍या नॅसकॉम संशोधनानुसार, एआय व ऑटोमेशनमध्‍ये २०२५ पर्यंत भारताच्‍या जीडीपीमध्‍ये ५०० बिलियन डॉलर्सची भर करण्‍याची क्षमता आहे. आज, लाभदायी डिजिटल करिअर घडवण्‍यासाठी कर्मचारीवर्गासाठी अधिक स्‍पष्‍ट, प्रत्‍यक्ष मार्ग आहेत. सर्विसनाऊ भारतातील डिजिटल करिअर घडवण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी ६०० हून अधिक मोफत प्रशिक्षण कोर्सेस आणि १८-रोजगार संबंधित प्रमाणन कोर्सेस देते. राष्‍ट्रीय स्‍तरावर सर्विसनाऊ व्‍यासपीठ कौशल्‍यांसाठी मागणी आहे आणि व्‍यक्‍तींना देशभरातील आघाडीचे उद्योग व सहयोगी कंपन्‍यांसोबत रोजगार प्रशिक्षण मिळवण्‍याच्‍या संधी आहेत. सर्विसनाऊ डिजिटल करिअरसाठी समान संधी देण्‍याकरिता राज्‍य व राष्‍ट्रीय उपक्रमांच्‍या सिरीजसह भारतातील कौशल्‍य वाढीमध्‍ये गुंतवणूक करत आहे. कंपनी सर्विसनाऊने वाढते भारतीय ग्राहक व सहयोगी इकोसिस्‍टममध्‍ये पदांना भरण्‍यास मदत करण्‍यासाठी गेल्‍या वर्षी भारतातील कंपन्‍यांसोबत १३ हून अधिक शैक्षणिक सहयोग केल्‍याची घोषणा केली आहे. ऑगस्‍टमध्‍ये सर्विसनाऊने भविष्‍यासाठी सुसज्‍ज कर्मचारीवर्ग तयार करण्‍यासाठी आणि महत्त्‍वपूर्ण व्‍यवसाय गरजांची पूर्तता करण्‍यासाठी एमईआयटीवाय नॅसकॉम डिजिटल स्किलिंग उपक्रम 'फ्यूचरस्किल्‍स प्राइम'सोबत सहयोगाची घोषणा केली.