Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : रस्ता सर्वेक्षणाचे काम करणारा तरुण अपघातात ठार

कोल्हापूर सांगली रस्त्यावर मजले हद्दीतील बसवान खिंडीत सांगले कोल्हापूर रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या व्यक्तीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने महादेव गायकवाड (वय, ३० रा. विकास नगर इचलकरंजी) याचा जागीच मृत्यु झाला. धडक इतकी जोराची होती की महादेव गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला काही क्षणातच मद्यपी आयशर चालकाने सांगलीच्या दिशेने भरगाव वेगाने पलायन केले. स्थानिकांच्या मदतीने व हातकणंगले पोलिसांच्या साहाय्याने कमलगे हद्दीत मद्यपी चालक व आयशर पकडण्यात यश आले.