इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी "आम्ही सावित्रीच्या लेकी" या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार महिलांचे बेमुदत आमरण उपोषण सुरुच आहे. दुसऱ्या दिवशी इचलकरंजी येथील म. गांधी पुतळा चौकामध्ये उपोषणस्थळी अनेक संस्था व संघटना, कार्यकर्ते, नागरिक व महिलांनी भेट देऊन या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.