Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :सुळकूड पाणी योजनेला मिळणार चालनाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची ग्वाही

इचलकरंजीला स्वच्छ पाणी देण्याची सरकारची जबाबदारी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेत दिल्यामुळे सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीला गती येणार आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीचे प्रदूषण शून्यावर आणण्यासाठीही निधी मंजूर करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे इचलकरंजीसह परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. सुळकूड योजना मंजूर झाली असली, तरी विरोधामुळे अंमलबजावणी झालेली नाही.