Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी! शासकीय मुद्रणालय, मुंबई अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील विविध पदांची सरळसेवा भरती; ऑनलाईन अर्ज

शासकीय मुद्रणालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (DGPS Maharashtra Bharti 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार एकूण 54 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ही भरती सरळसेवा कोट्यातून केली जाणार आहे. गट क संवर्गातील पदे याव्दारे भरण्याचे नियोजित करण्यात आले आहे. सदर भरती अंतर्गत सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), वरिष्ठ मुद्रितशोधक, मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनी चालक, बांधणी सहाय्यकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. पदाचे नाव वेतनश्रेणी सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) एस- १० रु. २९२०० ९२३०० वरिष्ठ मुद्रितशोधक एस- १० रु.२९२००-९२३०० मुद्रितशोधक एस ८ रु. २५५००-८११०० मूळप्रतवाचक एस-६ रु.१९९००-६३२०० दूरध्वनी चालक एस-७ रु. २१७००-६९१०० बांधणी सहाय्यकारी एस-५ रु.१८०००-५६९०० या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. PDF जाहिरात – DGPS Maharashtra Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज करा – Apply For DGPS Maharashtra Notification 2024 अधिकृत वेबसाईट – https://dgps.maharashtra.gov.in/