शुक्रवार दिनांक 16 रोजी सकाळी बारा वाजता सुळकुड पाणी योजनेसाठी महिलांचा आंदोलनाचा इशारा. इचलकरंजी शहरवासीयांसाठी महत्त्वाचे असलेल्या सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आता महिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार पासून महात्मा गांधी पुतळा चौकात अमरन उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपच्या वतीने देण्यात आली. यावेळी इचलकरंजी प्रांताधिकार्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी सुषमा साळुंखे, जोशना भिसे, शोभा इंगळे, स्वाती गणपती, संपदा कांबळे, शबाना कमाल, मुलींना कमाल, दीपा मलाबादे, मनीषा माणगावकर, सीमा पाटील, स्वाती कदम आदी महिला आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांसाठी आज देण्यात आली.