आज गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथे विनापरवाना बेकादेशीरित्या गावठी बनावट पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्याप्रकरणी इचलकरंजी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी इंगळे यांनी विनायक पाटील व अब्दुल मुजावर या दोघांना दोन वर्ष कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट एस पी पवार यांनी काम पाहिले. सदर घटना ही गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सदर आरोपींना दोन वर्षे कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोकवली असल्याची माहिती गावभाग पोलिसांच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे.