Logo
ताज्या बातम्या

पीएम मोदींनी घेतली संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी पीडित महिलांनी त्यांची व्यथा पीएम मोदींसमोर मांडली आणि पंतप्रधानांनी वडिलांप्रमाणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पीएम मोदींनी त्यांच्या व्यथा समजून घेतल्याने पीडित महिला खूप भावूक झाल्या होत्या, अशी माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथे जाहीर सभेनंतर पंतप्रधान मोदींनी पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल पंतप्रधानांना सांगितले, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस अग्निमित्रा पॉल यांनी पीटीआयला फोनवरून दिली. दरम्यान, संदेशखाली येथील स्थानिकांनी बारासात येथे पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी बोट आणि बसमधून प्रवास केला. संदेशखाली येथील महिला पंतप्रधानांच्या रॅलीसाठी जात असलेल्या काही बसेस पोलिसांनी सुरक्षा प्रोटोकॉल चे कारण देत अनेक ठिकाणी थांबवल्या, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.