Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :आमदार प्रकाश आवडे यांच्या तारदाळ येथील वक्तव्याचा निषेधार्थ तारदाळ येथे ग्रामस्थांचा गाव बंद ठेवून निषेध

मंगळवार दिनांक 13 रोजी सकाळी दहा वाजता तारदाळ येथे कडकडीत बंद. डिकेटीई संस्थेने तारदाळ येथील दहा एकर गायरान जागा क्रिडांगणासाठी चाळीस वर्षांपूर्वी भाडे तत्त्वावर घेतली आहे. या क्रीडांगणाच्या जागेत बंदिस्त हॉल कंपाऊंड चे उद्घाटन करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे आले असता तारदाळ ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. यावेळी आवाडें नी ग्रामस्थांना आरेरावी करत धमकी देऊन गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. याच्या निषेधार्थ तारदाळ येथे गाव बंद ठेवून आमदारांचा जाहीर निषेध करून गावातून रॅली काढण्यात आली. तसेच या गायरान जागेमध्ये बेकायदेशीर राजकारण करणाऱ्या डिकेटीई च्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आमदार प्रकाश आवडे यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ गेले दोन दिवस ग्रामस्थांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. ग्रामस्थांच्या वतीने बंद चे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी सोयीस्कर रित्या गाव बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. तसेच ग्रामस्थ आणि प्रकाश आवाडे यांच्या वक्तव्याचा भरपूर समाचार घेत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.