Logo
ताज्या बातम्या

पाच वर्षांत खतांच्या दरात ५४ टक्के वाढ

कधी अवकाळी, कधी महापूर, कधी दुष्काळ याने शेतकर्‍यांची नेहमीच दुर्दशा सुरू आहे. आता खतांच्या दरात पाच वर्षांत 54 टक्के वाढ करून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. खतांची दरवाढ कशी झाली? याशिवाय ठिबक सिंचन योजनेद्वारे जी खते दिली जातात, त्यातील चार खतांच्या दरात 100 ते 142 टक्के वाढ झाली आहे. तसेच यातील अन्य खतांच्या दरात 50 ते 57 टक्के वाढ झाली आहे. दुसर्‍या बाजूला उसाच्या एफआरपीमध्ये दरात सरासरी 4 टक्के वाढ झाली आहे. राज्य सरकारने ऊस तोडणी दरात 35 टक्के वाढ केली आहे, तर मुकादमाच्या कमिशनमध्ये 1 टक्का वाढ केली आहे. त्यामुळे एफआरपीमध्ये वाढ केली असा जो राज्य सरकार डांगोरा पिटत आहे, ते कधीच कमी झाले असून, दराच्या बाबतीत ऊस उत्पादन तोट्याच्या दिशेने सुरू आहे.