महाराष्ट्र सरकारने गुगल कंपनीसोबत सामंज्यस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि. ८) दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी फडणवीस म्हणाले की, AI फॉर महाराष्ट्र योजनेअंतरर्गत गुगल सोबत करार करण्यात आला आहे. या नव्या करारामुळे महाराष्ट्रात तंत्रज्ञानामध्ये प्रगती होईल. येत्या काळात नवीन तंत्रज्ञान विकसित केले जातील. यामुळे महाराष्ट्रातील अनेक सोईसुविधांमध्ये वाढ होईल. शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमध्ये विकास घडवून आणू शकतात. कृषी आणि आरोग्य विभागांमध्ये यामुळे सुधारणा होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.