Logo
सरकारी योजना

खावटी अनुदान योजना महाराष्ट्र 2024

आज आपण खावटी अनुदान योजना महाराष्ट्र यासंदर्भात या लेखात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही अनुदान योजना, त्याचे लाभ, आवश्यक पात्रता, शासन निर्णय, रजिस्ट्रेशन कुठे करायचे, अर्ज कुठे करावा, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर या योजनेचा नक्की लाभ घ्या. खावटी अनुदान योजना महाराष्ट्र खावटी अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारने फार पूर्वी पासून सुरू केलेली योजना होती. परंतु ती काही कारणांसाठी २०१३-१४ मध्ये बंद करण्यात आली होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटामुळे खावटी अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आदिवासी वर्गातील कुटुंबांना रुपये ४,०००/- आर्थिक मदत देते. देशात कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच त्यांची काम बंद झाली. त्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तसेच त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अशा कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. खावटी योजना अनुदान लाभ काय आहेत? या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आदिवासी कुटुंबांना ४,०००/- रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. सुमारे ११ लाख ५४ हजार लोकांना या अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्य सरकारने सुमारे ४८६ कोटी रुपयांचे बजेट असणारी ही योजना फक्त एका वर्षासाठी सुरू केली आहे. ही आदिवासी अनुदान रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आदिवासी जे मनरेगा मध्ये काम करणारे लोक एक दिवसासाठी कार्यरत असणारे मजूर घटस्फोटित महिला विधवा भूमिहीन कुटुंबे अपंग व्यक्तींचे कुटुंब अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब आदिम जमातीचे कुटुंबे आदिवासी वर्गातील लोक पारधी जमातीचे लोक खावटी अनुदान योजना महाराष्ट्र चे फायदे कोणते? राज्यातील चार लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. या योजनेमध्ये जिल्हा अधिकाऱ्याने घोषित केलेल्या किंवा मान्य केल्याचे काही महिला आहेत. त्यामध्ये घटस्फोटित महिला,विधवा, भूमिहीन कुटुंबे, अपंग व्यक्तींचे कुटुंब अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब असे एकूण ३ लाख या योजनेचा फायदा होणार आहे. आदिम जमातीचे २ लाख २६ हजार कुटुंबे यांचा समावेश करण्यात आला आहे. भूमिहीन, शेतमजूर त्याचबरोबर वैयक्तिक हक्क धारण करणारे कुटुंबाच्या जवळपास १ लाख ६५ हजार कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे एकूण आदिवासी समाजतील ११ लाख ५५ हजार लोकांना त्याचा फायदा होणार आहे. खावटी अनुदान योजना महाराष्ट्र अनुदान रकमेचे विवरण – प्रत्येक कुटुंबाला ४ हजारांची रोख रक्कम देण्यात येईल. तिचे वितरण ५०-५० टक्क्यांमध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजे लाभार्थी व्यक्तीला अनुदानित रकमेपैकी ५० टक्के रक्कम मिळणार आहे आणि त्याचबरोबर ५० टक्के रक्कम वस्तूरुपात मिळणार आहे. २,०००/- रुपये किमतीची रोख रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होणार होणार आहे. काही व्यक्तींचे बँकेमध्ये खाते नसते, तर या अकाउंट नसणाऱ्या लोकांसाठी पण त्यांनी एक सोय केलेली आहे. गावांमध्ये डाक विभागात खात्यामध्ये जर त्याने अकाउंट असेल, तर त्या अकाउंट मधून त्यांना ते २,०००/- रुपये मिळणार आहेत. बाकीचे २,०००/- रुपयांचा वस्तू स्थितीमध्ये फायदा होणार आहे. कुटुंबातील प्रमुख महिला आहे तिला २,०००/- रुपयांच्या किराणामाल देण्यात येतो. त्याच्यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, तेल, डाळी यासारख्या वस्तू आहेत त्या त्या व्यक्तीच्या महिलेच्या हातामध्ये सोपवण्यात येईल. अशाप्रकारे त्या कुटुंबाला या योजनेचा फायदा होणार आहे. खावटी अनुदान योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन (अर्ज प्रकिया, यादी) कुठे करायचे? आम्हाला योजनेचा फायदा कुठे घेऊ, कुणाकडे जाऊ किंवा रजिस्ट्रेशन कुठे आहे असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. गावांमध्ये ग्रामसेवक असतो आणि ग्रामसेवकाकडे तुम्ही जर गेले तर तिथे तुम्हाला त्याच्याकडे जाऊन या योजनेबद्दल माहिती मिळेल. तिथे तो व्यक्ती तुमचा रजिस्ट्रेशन करून घेईल, नोंदणी करून घेईल, यादी जाहीर होते आणि त्याचबरोबर काही गावांमध्ये तलाठी कार्यालय असते. त्या कार्यालयात जाऊन अर्जदार व्यक्तीला नोंदणी करता येणार आहे. ज्या यादीमध्ये लोकांची नाव आहेत त्यांना अनुदान योजनेचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या योजनेबद्दल माहिती ती घेतली आणि तुम्ही स्वतःसाठी याचा फायदा करून घेऊ शकतात. खावटी अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन एप्लिकेशन कुठे करायचे? तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरून देखील या योजनेसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करता येईल. त्यासाठी खालील दिलेल्या महाडीबीटी पोर्टलच्या ऑफिसिअल वेबसाईटच्या लिंक वर जावा. आणि तेथून या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून अर्ज करून लाभ घ्या महाडीबीटी ऑफिसिअल वेबसाईट