Logo
सरकारी योजना

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी 2023

आज आपण महाराष्ट्र रेशन कार्ड(शिधापत्रक) संबंधीची संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये रेशन कार्ड साठी अर्ज कुठे मिळतील ?(Online Form), अपडेट्स, पिवळे रेशन कार्ड नोंदणी नवीन online, नवीन रेशन कार्ड माहिती, नाव कमी करणे, नाव वाढवणे, यांसाठी आवश्यक कागदपत्रे, टोलफ्री नंबर, रेशन न मिळाल्यास काय करावे, रेशन Online कसे तपासावे, धान्य दर, शिधापत्रिकेच्या रंग कशावरून ठरवला जातो या सर्व प्रश्नाची उत्तर आज तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा. महाराष्ट्र रेशन कार्ड नवीन अपडेट – संपूर्ण भारतात कोरोना विषाणूची लागण होत आहे. लॉकडाऊनमुळे पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील गरीब जनतेला २/- रुपये किलो दराने गहू उपलब्ध करुन देईल आणि तांदूळ ३/- रुपये किलो दराने देण्यात येणार आहे. शासनाच्या पुरविल्या जाणाऱ्या या सुविधांचा लाभ महाराष्ट्रातील गरीब लोकही घेऊ शकतात आणि त्यांचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात. रेशन कार्ड साठी अर्ज कुठे मिळतील ?(Online Form) | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी Online परिमंडळ कार्यालय विभाग संत तुकाराम व्यापारी संकुल, दुसरा मजला, निगडी, पुणे ४११ ४०४ महानगरपालिका क्षेत्रातील ठराविक महा-ई-सेवा केंद्रात तुम्हाला नवीन रेशन कार्ड शिधा पत्रक साठी अर्ज मिळतील. अर्ज सादर करताना रू.२ चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागेल. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज अर्ज कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री कुटुंब प्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज अर्जदार कुटुंबप्रमुख स्त्रीचे दोन फोटो त्यावर अर्जदाराची सही आधार कार्डची प्रत किंवा आधार कार्ड नोंदणीची पावतीची साक्षांकित झेरॉक्स प्रत नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या शिधा पत्रकातील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे आणि जर तो दाखला नसेल, मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला पत्त्याचा आणि जागेच्या पुराव्यासाठी स्वतःच्या घराचे विज बिल किंवा चालू वर्षाची उत्पन्नाचा दाखला. तसेच घर भाड्याने असल्यास, घर मालकाचे संमतीपत्र व त्याचे नावे असलेले वीज बिल किंवा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. दुबार रेशन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळणेकरिता अर्ज जर तुमचे रेशन कार्ड हरवले असले आणि तुम्हाला नवीन रेशन कार्ड हवे असले, तर त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे असतील. रेशन कार्ड हरवल्याबाबत पोलीसांचा दाखला दुकानदारा कडील रेशन कार्ड चालू असल्याबाबतचा सही व शिक्का असणारा दाखला अर्जासोबत ओळखपत्र पुरावा कार्ड खुप जुने झाले असले व त्यावरील अक्षरे ही पुसट असतील, तर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र आवश्यक आहे. रेशन कार्ड जीर्ण झाले असेल, तर मूळ जीर्ण कार्डवर दुकानदाराची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड मध्ये नाव वाढवायचे असेल तर काय करावे? रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी Online युनिटमध्ये वाढ करणेबाबत अर्ज लहान मुलांचे नाव वाढवण्यासाठी मुलांचे जन्माचे दाखले आणि शाळेतील बोनाफाईड दाखल्यांची साक्षांकित प्रत मोठ्या व्यक्तीचे नाव वाढवण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा दाखला पत्नीचे नाव वाढवण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केल्या बाबत तहसिलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला तसेच लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. नाव कमी करायचे असल्यास काय करावे? युनिट कमी करणे(नाव वगळणे) बाबत अर्ज परगावी राहण्यास जात असल्यास पहिले मूळ कार्ड आणि नाव कमी करण्याचा अर्ज मयत असल्यास मयत दाखला मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा अर्ज भरावा. या अर्जासोबत ओळखपत्र पुरावा जोडणे आवश्यक आहे. रेशन कार्ड अर्ज भरल्यापासून किती दिवसात मिळेल? दुबार रेशन कार्ड मिळण्यासाठी ८ दिवसाचा कालावधी लागेल नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागेल चालू रेशन कार्ड मधील नावात बदल व युनिट मध्ये वाढ अथवा घट केल्यास रेशन कार्ड परत मिळण्यासाठी ३ दिवसाचा कालावधी लागेल. महिन्याला रेशनकार्डवर किती धान्य मिळते ते ऑनलाईन कसे चेक करावे ? सर्वप्रथम तुम्हाला mahafood.gov.in हे गुगल वर सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर महा फूड हे गव्हर्मेंट चे पोर्टल उघडेल. त्यावर तुम्हाला ऑनलाइन रास्त भाव दुकाने या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल त्यामध्ये AePDS- सर्व जिल्हे यावर क्लिक करायचे आहे. तुमच्या पुढे आणखी नवीन पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हाला RC Details New या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक RC Details असे एक टायटल असलेले नवीन पृष्ठ ओपन होईल. त्याच्या खालीच तुम्हाला SRC नंबर जोकी तुमच्या रेशन कार्ड च्या पहिल्या पृष्ठावर वरच्या किंवा खालच्या कोपर्‍यात असतो तो बारा अंकी ARC नंबर त्या बॉक्स मध्ये भरावा लागेल. एस आर सी नंबर च्या शेजारी महिना आणि वर्ष तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्या महिन्यात मिळालेले ऑनलाइन राशन धान्य चेक करू शकता. नंबर आणि वर्ष, महिना भरुन झाल्यास तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरील धान्य वाटपाची ओंलीने माहिती मिळू शकते. पिवळी, केसरी किंवा पांढरी शिधापत्रिका कशावरून ठरवले जाते? शिधापत्रिकेचा रंग हा कुटुंबाचा वार्षिक उत्पादनाची मर्यादा यावरून ठरवला जातो. त्यामध्ये पिवळी शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिका आणि शुभ्र शिधापत्रिका यांची उत्पादन मर्यादा ही खाली दाखवल्याप्रमाणे असणार आहे. पिवळी शिधापत्रिकेची वार्षिक उत्पादन मर्यादा ही १५ हजारापर्यंत असते. केसरी शिधापत्रिकेची वार्षिक उत्पादन मर्यादा ही रुपये १लाखापर्यंत असते. पांढरी शिधापत्रिकेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पादन मर्यादा ही रुपये १ लाख व त्यापुढील असते. राशन स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर काय आहेत? गहू – २/- रुपये किलो तांदूळ – ३/- रुपये किलो साखर – २०/- रुपये किलो तूरडाळ – ३५/- रुपये किलो उडीद डाळ – ४४/- रुपये किलो घासलेट म्हणजेच रॉकेल -२४.५०/- रुपये प्रति लिटर मित्रांनो जर रेशन दुकानदार म्हणजेच स्वस्त धान्य दुकानातील दुकानदार हा तुमच्याकडून यापेक्षा जास्त दराने पैसे घेत असेल आणि तुम्हाला रेशन माल घेतल्यानंतर पावती देत नसेल, तर तुम्ही स्थानिक पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल करू शकता. रेशन न दिल्यास काय करावे? मित्रांनो, जर तुम्हाला रेशन मिळाले नाही तर अशा परिस्थितीत कोणत्याही कार्डधारकांना रेशन घेण्यास जर अडचण येत असेल, तर ते संबंधित जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालय किंवा राज्य ग्राहक सहाय्यक केंद्रावर त्याबाबतची तक्रार तुम्ही करू शकता. यासाठी सरकारने टोल फ्री नंबर सुरु केलेले आहेत या नंबरवर ग्राहक त्यांच्या तक्रारीची नोंद करू शकतो. १८००-१८०-२०८७, १८००-२१२-५५१२ आणि १९६७ हे टोल फ्री क्रमांक सुरु केलेले आहेत. तसेच अनेक राज्य सरकारांनी स्वतंत्रपणे त्यांचे हेल्पलाईन क्रमांक देखील सुरू केलेले आहेत. अधिकृत संकेतस्थळ (Reshan Card Official Portal) – http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx