Logo
ताज्या बातम्या

सी गार्डियन ड्रोन खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा

अमेरिकेकडून भारतालाल भेदक आणि घातक अशा सी गार्डियन ड्रोनच्या विक्रीच्या प्रस्तावाला बायडेन प्रशासनाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतची अधिसूचना त्यांनी अमेरिकी काँग्रेससमोर सादर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आपल्या अमेरिका दौर्‍यात एमक्यू 9 बी सी गार्डियन या मानवरहित विमानांची खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतरच्या काळात याबाबत करारमदार झाल्यानंतर भारताने 31 सी गार्डियन ड्रोन खरेदी करण्याचे निश्चित केले. काही काळापूर्वी पन्नू या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या कटावरून या करारावर प्रश्नचिनह निर्माण झाले होते. पण आता बायडेन प्रशासनाने या कराराला हिरवा कंदील दाखवला असून तशा आशयाची अधिसूचना अमेरिकी काँग्रेसमध्ये सादर केली आहे. यामुळे 31 ड्रोन खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. शत्रूभागाची टेहळणी, हल्ला या कामांसाठी सी गार्डियन हे ड्रोन वापरले जातात. त्यांची मारकक्षमता मोठी असल्याने भारताच्या ताफ्यात शक्तिशाली साधन सामावले जाणार आहे. भारत या 31 ड्रोनची खरेदी करण्यासाठी 3.99 अब्ज डॉलर्स मोजणार आहे. हे ड्रोन लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांत त्यांचा समावेश केला जाणार आहे.