Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :येथे श्रमिक महासंघाचा प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा, प्रांताधिकार्‍यांना निवेदन

शुक्रवारी दुपारी बारा वाजता महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघ इचलकरंजी यांच्या वतीने श्रमिक महासंघाच्या विविध मागणीसाठी प्रांत कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात श्रमिक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते.यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शीरस्तेदार यांना सादर केले. यावेळी महाराष्ट्र राज्य संघ श्रमिक महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन इंचलकरंजी प्रांताधिकारी यांना देवुन विविध मागण्यांचा त्वरित शासनाने विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे. यावेळी श्रमिक महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या घोषणाबाजींनी परिसर दणाणून निघाला आहे.यावेळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.