मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगेंनी सरकारला संध्याकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच, तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, नाहीतर आजपासून पुन्हा पाणी पिणं बंद करणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चे काढण्यास परवानगी नसणार आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही शस्त्र किंवा शरीराला इजा पोहचेल अशा वस्तू देखील वापरता येणार नसल्याचं प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या होत्या. सोबतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात देखील दगडफेकीच्या घटना समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासन देखील अलर्ट झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागासाठी जमाबंदीचे आदेश काढले आहे. त्यामुळे या काळात आता पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) आज सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार , अशोक चव्हाण, अंबादास दानवे , उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणं गरजेचं असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.