Logo
ताज्या बातम्या

इस्राइलप्रमाणेच भारत बनवतंय स्वतःची 'आयर्न डोम' सिस्टीम; हवाई हल्ल्यांपासून मिळणार संरक्षण - रिपोर्ट

इस्राइलच्या 'आयर्न डोम' सुरक्षा प्रणालीची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे. याच सिस्टीममुळे हमासच्या हल्ल्यात इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. आता भारत देखील अशाच प्रकारची यंत्रणा तयार करत आहे. यामुळे हवाई हल्ल्यांपासून देशाला पूर्ण संरक्षण मिळणार आहे.टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारतीय वायुसेनेच्या सूत्रांनी टाईम्सला याबाबत माहिती दिली आहे. भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम 'प्रोजेक्ट कुशा' अंतर्गत डीआरडीओ विकसित करत आहे. हे 350 किलोमीटर अंतरांपर्यंत स्टील्थ फायटर प्लेन, विमान, ड्रोन, क्रूज मिसाईल आणि इतर हवाई हल्ला करणाऱ्या हत्यारांना नष्ट करू शकतं.2022 साली कॅबिनेट सुरक्षा समितीने एलआर-एसएएम (LR-SAM) प्रणालीच्या विकासाला परवानगी दिली होती. ही सुरक्षा प्रणाली 2028-29 पर्यंत तयार करण्याचं लक्ष्य आहे. यानंतर संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलासाठी पाच स्क्वाड्रन विकत घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. यासाठी सुमारे 21,700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.कसं असणार भारताचं आयर्न डोम? भारताच्या या संरक्षण प्रणालीमध्ये लांब पल्ल्यापर्यंत लक्ष ठेवणे, फायर कंट्रोल रडार आणि शत्रूच्या मिसाईल आणि हवाई हल्ला करणाऱ्या उपकरणांना पाडण्यासाठी विविध प्रकारच्या इंटरसेप्टर मिसाईल असणार आहेत. यामध्ये 150 किमी, 250 किमी आणि 350 किमी एवढ्या अंतरावरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता असणार आहे, असंही सूत्रांनी स्पष्ट केलं.