भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. १० वर्षांपूर्वी भारत ११ व्या क्रमांकावर होता. येत्या काही वर्षात भारताचा जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.१०) व्यक्त केला. गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या बंदर पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या नवीन गुंतवणुकीसाठी UAE मधील कंपन्यांकडून करार करण्यात आले आहेत. जग भारताकडे एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून पाहत आहे. एक विश्वासू मित्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारत लोककेंद्रित विकासावर विश्वास ठेवतो. ग्लोबल गुड, जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचे इंजिन, उपाय शोधण्याचे तंत्रज्ञान केंद्र, प्रतिभावान तरुणांचे पॉवर हाऊस आणि सदृढ लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते.