इचलकरंजी येथे पत्रकार दिनानिमित्त इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांना 'इचलकरंजी भूषण' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कैश बागवान (उद्योजक), दीपक राशिनकर (वस्त्रोद्योग), अनिकेत माने (क्रीडा), सौ. रमा फाटक (सामाजिक) व श्री माधव विद्यामंदीर (शैक्षणिक) यांना गौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.