Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :वस्त्रोद्योगाला प्रोत्साहनाची केंद्राची भूमिका

भारतीय वस्त्र उद्योगातील सर्व घटकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील सर्व क्षेत्राच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे. याचे दर्शन नवी दिल्ली येथे २६ ते२९ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भारत टेक्स या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनात होणार आहे. इचलकरंजीतील उद्योजकांनी आपली वस्त्र उत्पादने सादर करावीत आणि उद्योजकांनी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून माहिती घेऊन उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त रूप राशी यांनी व्यक्त केले.