भारतीय डाक विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी दिली आहे. येथे चालक (सामान्य श्रेणी) पदासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख ४२ दिवस आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ रिक्त जागा तपशील (India Post Recruitment 2024 vacancy details)
भारतीय डाक विभागाच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण ७८ पदांची भरती केली जाणार आहे. दळणवळण मंत्रालयाच्या भारतीय डाक विभागाने ही भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी केवळ ऑफलाइन अर्ज करता येतील. इच्छुक उमेदवार या वेबसाइटला भेट देऊन तपशील जाणून घेऊ शकतात. वेबसाइटचा पत्ता आहे – indiapost.gov.in.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ पात्रता निकष (India Post Recruitment 2024 Eligibility Criteria)
मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, त्यांच्याकडे वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना देखील असावा. तीन वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभवही आवश्यक आहे.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ वयोमर्यादा (India Post Recruitment 2024 age limit)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ निवड प्रक्रिया (India Post Recruitment 2024 selection process)
उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे होईल. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नोटीसमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादींची माहिती दिली आहे.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ अधिसुचना
अधिकृत सुचना काळजीपूर्वक वाचा – https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/06012024_UPdriver_English.pdf
भारतीय डाक विभाग भरती २०२४ पगार : India Post Recruitment 2024 Salary
उमेदवाराची निवड झाल्यास महिन्याचा पगार १९,९०० रुपये ते ६३,२०० रुपयांपर्यंत असू शकतो
भारतीय डाक विभाग भरती २०२४साठी अर्ज कसा करावा (India Post Recruitment 2024: How to apply)
१६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी अर्ज या पत्त्यावर अर्ज पोहोचले पाहिजेत.
पत्ता – व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर, 208001. उत्तर प्रदेश.
अर्जासाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.