Logo
सरकारी योजना

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2024

आज आपण महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य काय, लाभ कोणते, पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती,अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल.जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल. विधवा पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने २३ लाखांचे बजेट तयार केले आहे. महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे ती स्वत: चे आयुष्य जगू शकेल, तीला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. राज्यातील इच्छुक विधवा महिलांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांनी या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाने दरमहा दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.