Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :मोफत आरोग्य सेवा पुरवणार : आयुक्त ओमप्रकाश दिवटे

इचलकरंजी नागरिक मंच, बिझनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुपतर्फे सुरू असलेली अन्नदान श्रेष्ठदान चळवळ ही एक हजार दिवस पूर्ण करण्याच्या टप्प्यावर पोहचली आहे. भविष्यात या चळवळीमधून लाभार्थ्यांना इचलकरंजी महापालिकेतर्फे आरोग्य सेवा व औषधांची तरतूदही करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. ते इचलकरंजी नागरिक मंच, बिझनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुपमार्फत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.