Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :रोटरी क्लब ऑफ सेंट्रल 'टेक्स्पोजर २०२४' चे आयोजन

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटतर्फे 'टेक्सपोजर - २०२४' या टेक्सटाईल मशिनरी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ७ ते १० जानेवारीदरम्यान पंचरत्न सांस्कृतिक भवन येथे हे प्रदर्शन होणार आहे. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी, यासाठी उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात नामवंत कंपन्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे २२० स्टॉलचा सहभाग असणार आहे.