Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कामास गती; आमदार प्रकाश आवाडे

शहापूर विश्रामगृहाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामाची आमदार प्रकाश आवाडे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. कामाची माहिती घेत आवश्यक त्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. वाहनधारकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी इचलकरंजीत स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. त्यासाठी आमदार आवाडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार इचलकरंजी शहरासाठी एमएच ५१ हा स्वतंत्र वाहन नोंदणी क्रमांक दिला आहे.