Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :चायनीज खाल्यामुळे समृद्धी उर्फ गौरी कांबळे या विद्यार्थिनीचा विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू

इचलकरंजी शहरातील दहावीत शिकणाऱ्या समृद्धी उर्फ गौरी नितीन कांबळे राहणार कुढचे मळा या मुलीने रस्त्यावरील शाळेजवळ चायनीज खाल्ल्यामुळे फूड पॉइजन होऊन उपचारा दरम्यान आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात बाहेर हंबरडा फोडला होता या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजी शहरात असणारे गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावी शिकणारी मुलगी समृद्धी उर्फ गौरी कांबळे गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये क्रीडा महोत्सव असल्याने शाळेबाहेरील चायनीज गाडीवर गोबी मंचूरियन खाल्ली होती. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळ पासून तिला उलटी, ताप यांसारखा त्रास होऊ लागला. तिच्या आई-वडिलांनी शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी चार दिवसांपूर्वी दाखल केले होते. चायनीज खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाल्यामुळे मोठ्या त्रास होऊ लागला होता. उपचारदरम्यान समृद्धी उर्फ गौरी कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी व मित्र परिवारांनी इंदिरा गांधी रुग्णालया बाहेर एकच हंबर्डा फोडला होता. गौरी ही शहरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिकत होती. अतिशय हुशार मुलगी होती. तिच्या वडिलांचा स्वतःचा ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. गौरी शाळेमध्ये स्पोर्ट मध्ये व सर्वच विषयांमध्ये हुशार होती. शाळेबाहेर चायनीज गाड्या लावले असता त्यामुळे, मुले सुट्टीच्या वेळेमध्ये असे पदार्थ खात असतात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास होतो. गौरीने सुद्धा चायनीज गोबी मंचुरियन खाल्ली होती. त्यामुळे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला त्रास झाला होता. विषबाधा होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीचे मटेरियल वापरले जात नाही. त्याचा परिणाम खाणाऱ्यावर होत असतो. कमी खर्चामध्ये फेरीवाले पदार्थ तयार करत असतात‌ चांगल्या पद्धतीच्या मटेरियल वापरत नसल्यामुळे रस्त्यावरचे चायनीज, चिकन 65, वडापाव भेळ खाल्ल्यामुळे अनेकांना विषबाधा होऊन यांचा त्रासही झालाय व उपचार घेतले रस्त्यावरील खाद्यपदार्थावर सध्या अन्न औषध प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व तिच्या आई-वडिलांनी शासनाकडे केली आहे. आज जर चायनीज विक्रेत्यांनी चांगल्या पद्धतीने खाद्यपदार्थ वापरले असते त्रास गौरी कांबळेचा मृत्यू झाला नसता. खाद्यपदार्थ चांगले वापरले नसल्यामुळे गौरीचा अजून मृत्यू झालाय. कुडचे मळा परिसरामध्ये तिच्या अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जे चायनीज गौरीने खाल्ले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे मागणी तांबे कुटुंबीयांनी केली आहे‌. शहरातील बेकायदेशीर व स्वच्छता नसलेल्या चांगले पदार्थां न ठेवलेल्या हातगड्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.