अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनासाठी 22 जानेवारीनंतर मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 36 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या विशेष ट्रेनच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना प्रभू रामाचे दर्शन घडविण्याची योजना मुंबई भाजपने आखली आहे; तर 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी दिली.
प्रत्येक विधानसभेतून सामान्य नागरिकांना अयोध्येत नेण्यासाठी 22 जानेवारीनंतर विशेष ट्रेन नेली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शेलार म्हणाले की, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक राज्यांना केंद्रातून सर्वसमावेशक कार्यक्रम दिला आहे.