सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही ही DRDO मधील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास, तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता. drdo.gov.in. या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही रेजिस्ट्रिशन करु शकता. या भरती अंतर्गत 102 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
DRDOमध्ये विविध पदांवर भरती
डीआरडीओ भरतीअंतर्गत विविध भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेत भांडार अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि खाजगी सचिव या पदांवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे म्हणजे 56 वर्षांपर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील
या भरती मोहिमेअंतर्गत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने उमेदवारांना तीन वर्षांच्या कराराच्या आधारावर भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 102 पदांपैकी स्टोअर ऑफिसरच्या 17 जागा, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 20 जागा आणि खाजगी सचिव पदाच्या 65 जागा रिक्त आहेत.
वयोमर्यादा
DRDO मध्ये या भरतीसाठी उमेदवारांचं वय 12 जानेवारी 2024 रोजी 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
शैक्षणिक पात्रता
DRDO भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणं आवश्यक आहे. खाजगी सचिवांच्या 65 पदांवर भरती होणार आहे. याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 20 आणि स्टोअर ऑफिसरच्या 17 पदांवर भरती होणार आहे.