Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : येथे आरपी रोडवरील जैनको टाॅवरच्या तिसऱ्या मजल्यावर उडी घेऊन एकाची आत्महत्या शिवाजीनगर पोलीससात घटनेची नोंद

इचलकरंजी येथे तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन युवकाची आत्महत्या. आरपी रोडवरील जैनको टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर उडी घेऊन अमर साळुंखे यांनी आत्महत्या केली.सदरची घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. परिणामी याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अमोल साळुंखे गेल्या दहा वर्षापासून मानसिक रुग्ण होता. तो आयुष्यभर कोरोची येथे राहण्यासाठी होता. मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह चालवत होता. परिणामी जैन को टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन त्याने उडी मारली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या खिशात असलेल्या मोबाईल वरून पोलिसांनी साळुंखे च्या नातेवाईकांशी संपर्क साधला. सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशन मध्ये झाले आहे.