Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :महाराष्ट्रातील धोबी समाजाबरोबर नवं युवकांना न्याय देणार, इचलकरंजी येथे धोबी समाज राज्याध्यक्ष चेतन शिंदे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्रातील धोबी समाजाबरोबरच नवयुवकांना न्याय देणार चेतन शिंदे यांचे प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष व समाजाचे नेते माननीय बालाजी शिंदे साहेब उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी या संघटनेचे कार्य गेले तीस वर्ष करीत आलो आहे.महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत. परंतु धोबी समाजाचा आरक्षण प्रश्न आपल्या संघटनामुळे पुढे गेला आहे. हे या महाराष्ट्रातील समाज बांधव नाकारू शकत नाही, मराठा बरोबर ओबीसी प्रश्न आहेत. त्याचबरोबर लहान लहान जातींचे प्रश्न देखील आपण या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. याकरिता आपल्या समाजाने अनेक आंदोलन केले आहेत. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या नागपूर च्या आंदोलनावेळी 30 मिनिटे भाषण केले‌ या भाषणामध्ये धोबी समाजावर अन्याय होत आहे. आणि धोबी समाजाला न्याय मिळवून देणारच असे आश्वासन दिले होते. त्याचा आता विसर पडलेला आहे. म्हणून या शिंदे सरकारला आपल्या धोबी समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. म्हणून 25 फेब्रुवारी रोजी आपण शिवाजी पार्क येथे धरणे आंदोलनाचे एलगार करीत आहोत. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात भाग घेण्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे शिंदे यांनी आव्हान केले आहे.