इचलकरंजी येथे झालेल्या 19 वर्षाखालील विभागीय खो - खो स्पर्धेत मुलांच्या संघात गोविंदराव हायस्कूल संघ तर मुलींच्या गंगामाई गर्ल्स हायस्कूल संघ या संघाने विजेतेपद पटकावले. या दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या सहकार्याने तीन दिवसीय कोल्हापूर विभागीय शालेय शासकीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.