Logo
राजकारण

मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत आज लाक्षणिक उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला इचलकरंजीतील सकल मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला. याशिवाय यासाठी सोमवार दि. 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय झालेल्या समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. शिवाजी उद्यानात झालेल्या या बैठकीला मराठा समाजातील सर्वच पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये सर्वांनी आपली मते मांडली.